Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Back

Bhau Padhye


Buy Bhau Padhye's Books भाऊ पाध्ये यांचं पूर्ण नाव प्रभाकर नारायण पाध्ये. त्यांचा जन्म दादर येथे २६ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. मुंबई विद्यापीठातून १९४८ साली त्यांनी अर्थशास्त्र घेऊन पदवी मिळवली. १९४९ ते ५१ या काळात ते कामगार संघटनेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते होते. नंतर किंग जॉर्ज हायस्कूल (दादर), एल कदूरी हायस्कूल (माझगाव) आणि बी. एस. इझिकेल हायस्कूल (सँडहर्स्ट रोड), येथे प्रत्येकी एक वर्ष शिक्षकाची नोकरी केली. पुढे स्प्रिंग मिल (वडाळा) येथे ४ वर्षं आणि आयुर्विमा महामंडळ येथे ४ महिने कारकुनी केली. १९५६ साली शोशन्ना माझगावकर या कामगार संघटनेच्या कार्यकर्तीशी लग्न. 'हिंद मझदूर', 'नवाकाळ' (१ वर्ष), 'नवशक्ति' (११ वर्षं) या नियतकालिकांतून पत्रकारिता. 'नवशक्ती' सोडल्यावर काही काळ 'झूम' या सिने-साप्ताहिकाचे संपादन. 'रहस्यरंजन', 'अभिरुची', 'माणूस', 'सोबत', 'दिनांक', 'क्रीडांगण', 'चंद्रयुग' या नियतकालिकांतून स्तंभलेखन. १९८९पासून अर्धांगाच्या आघाताने लेखन अशक्य झालं. मृत्यू- ३० ऑक्टोबर १९९६