Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Back

Subhash Bhende


Buy Subhash Bhende's Books सुभाष भेंडे (ऑक्टोबर १४, इ.स. १९३६; बोरी, गोवा - डिसेंबर २०, इ.स. २०१०; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी साहित्यिक होते. ऑक्टोबर १४, इ.स. १९३६ रोजी गोव्यातील बोरी या गावात भेंड्यांचा जन्म झाला. केपे या स्वतःच्या मूळ गावातून ते शिक्षणासाठी सांगली येथे गेले. त्यांचे शिक्षण सांगली व पुण्यात झाले होते. त्यांनी अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली होती. ते मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. गोवा मुक्तिसंग्रामानंतर प्रकाशझोतात आलेल्या साहित्यिकांपैकी ते एक होते. इ.स. २००३ साली कराड, महाराष्ट्र येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच वळवयी येथे झालेल्या २१ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. डिसेंबर २०, इ.स. २०१० रोजी मेंदूतील रक्तस्रावामुळे त्यांचे मुंबई येथील निवासस्थानी निधन झाले.