Summary of the Book
हे पुस्तक महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणा-या विविध परीक्षा,बँकासाठी होणा-या निवड परीक्षा,माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा,महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा इत्यादी परीक्षांना उपयुक्त व आवश्यक पुस्तक. गणित हा विषय अनेकांचा नावडता व परीक्षेच्या दृष्टीने अवघड ठरतो. याचे मुख्य कारण म्हणजे गणितातील मुळ संकल्पना व्यवस्थित न समजणे.
शिक्षकांनी सोप्या भाषेत हा विषय समजावून दिल्यास अगदी अभ्यासात साधारण असणाऱ्या विद्यार्थ्यालाही त्याचे आकलन होऊन गणितात सर्वाधिक गुण पडू शकतात. आता तर प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये गणिताचा समावेश असतो. हा विषय स्वयंअध्ययन करून कसा शिकता येतो या विषयी 'स्पर्धा परीक्षा गणित' मधून वा. ना. दांडेकर, ना. श्री. उत्पात यांनी मार्गदर्शन केले आहे. .
गणितातील प्रत्येक घटकाची ओळख करून देऊन त्याचीउदाहरणे नमुनादाखल सोडवून दिली आहेत. सरावासाठीही भरपूर प्रश्न दिले आहेत.
त्याची उत्तरे देतानाच ते कशी सोडवायचे याविषयी मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. सात प्रश्नपत्रिका दिल्या असून, त्या ठराविक वेळेत सोडविल्यास स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांची तयारी पूर्ण होईल.