Summary of the Book
परीक्षा म्हंटली, की भलेभल्यांचीही धाकधूक वाढते. अगदी शालेय, महाविद्यालयीन, स्पर्धा परीक्षा असली, तरी अभ्यासाचे नेटके नियोजन असले, की परीक्षेचाही बागुलबुवा वाटत नाही. यासाठी अभ्यास कसा करावा याबद्दल मार्गदर्शन हर्षला कांबळी यांनी 'परीक्षेत १००५ रिझल्ट'मधून केले आहे. शाळा- महाविद्यालयातून आपल्याला पायाभूत शिक्षण मिळते. ते पुढील आयुष्यात उपयुक्त ठरते, असा सल्ला देत विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यापूर्वी ध्येयनिश्चिती केली, तर आयुष्यात यशप्राप्ती सहज होते, हे यात सांगितले आहे.
जबाबदारीची जाणीव, मेहनत, आळस सोडून देणे, चांगल्या सवयी लावणे, शिस्त बाळगणे, सकस आहार घेत आरोग्य निरोगी ठेवणे, सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे, आत्मविश्वास, एकाग्रता, स्मरणशक्ती, वाचन, अभ्यास कौशल्य, वळणदार अक्षर आदी बाबींबर लक्ष देणे आवश्यक आहे. स्मार्ट अभ्यासपद्धती, कल्पनाशक्ती, योग्य परीक्षातंत्र यांचा अवलंब कसा करावा, हे यातून सांगितले आहे. पालकांची, शिक्षकांची भूमिका कशी असावी,
याबाबतही मार्गदर्शन केले आहे.