Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back
सेक्स, स्कॉच, अँड स्कॉलरशिप

सेक्स, स्कॉच, अँड स्कॉलरशिप-Sex Scotch And Scholarship by Khushwant Singh - Mehta Publishing House



सेक्स, स्कॉच, अँड स्कॉलरशिप-Sex Scotch And Scholarship by Khushwant Singh - Mehta Publishing House
Hard Copy Price: Rs.125   Rs. 119 /   $ 2.70
Buy Book
Available in 3-5 Days

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

सेक्स, स्कॉच् , अँड स्कॉलरशिप हे प्रख्यात पत्रकार खुशवंतसिंग यांचे 'समग्र’ स्वरुपाचे लिखाण आहे. 'विकली’सारख्या तत्कालिन अग्रणी असलेल्या साप्ताहिकाचे संपादकपदी राहिलेल्या खुशवंतसिंगांनी अनेक सन्माननिय जबाबदार्‍यादेखील सांभाळल्या आहेत. सेक्सविषयी खुलेआमपणे बोलत राहणारा, वात्रट जोक सांगणारा आणि 'स्त्री’ हाच एकमेव आवडता विषय असल्याचं भासवणारा हा माणूस चतुरस्त्र आहे. मात्र जाणीवपूर्वक स्वत:ची अशी प्रतिमा तयार करुन ती जपणारे खुशवंतसिंग स्वत:ला कुतूहलाचा विषय -- यशस्वी झाले हे नक्की...!

त्यांच्या प्रस्तुत पुस्तकाचं नाव योजतांना सुध्दा बघा, पहिल्या क्रमांकावर सेक्स, दुसर्‍यावर स्कॉच आहे आणि स्कॉलरशिप सर्वात शेवटी आहे. वस्तुत: हे पुस्तक दोन वर्षापूर्वीच प्रसिध्द झाले आहे. ओघवत्या शैली, ती सहज वर्णन केल्याप्रमाणे असलेलं हे लिखाण अत्यंत मार्मिक आहे. भरपूर अनुभवांनी आपलं जीवन समृध्द केलेल्या खुशवंतसिंगांनी केलेलं बहुआयामी लिखाण या पुस्तकात एकत्र झालं आहे. स्वत:विषयी सुरुवातीलाच त्यांनी लिहिलं आहे. ज्यातून स्वत:वर भरपूर पैसा करणारं त्याचं व्यक्तीमत्व स्प झालं आहे...

जीवनातील सत्य या सदराखाली त्यांनी लिहिलेल्या, भारतीय जीवनातील कामसूत्र, विनोद आणि गरीबी या तीन लेखांमधील आशय विचार करायला लावणारा आहे. त्यानंतर झैलसिंग, हिदायतुल्ला, बलवंत गार्गी अशी व्यक्तीचित्रणं येतात. त्रोटकपणेच पण सहज ओघानं लिहून व्यक्तीचित्र रेखाटण्याचा त्यांचा हातखंडा आहे. (माझ्या जीवनात आलेल्या स्त्रीया आणि पुरुष हे पुस्तक याकरिता आवश्य वाचावे.)

त्यानंतर ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि भारतातील प्रवास वर्णन आले आहे व पुढे कथा, ललीत व धार्मिक अनुवाद देखील आहे. प्रवास वर्णनातही भौगोलिक संदर्भापेक्षा तेथील समुह मन, राजकीय अन् सांस्कृतिक वैशिये यांना अग्रक्रम आहे. खुशवंतसिंग म्हणजे 'चीप’, वात्रट आणि सर्दव तेच तेच असं मत बनवून घेणार्‍यांनी धर्म या सदराखाली 'जादूचे शब्द’ हा लेख जरुर जरुर वाचावा.

प्रस्तुत पुस्तकाचा मराठी अनुवाद अनिल किणीकर यांनी सिध्द केला असून तो मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी प्रकाशित केला आहे.
Authors: खुशवंत सिंग 
Translators: अनिल किणीकर 
Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस
Language: मराठी
Category: सदरलेखन संग्रह
Pages: 232
Weight: 300 Gm
ISBN10: 81-7161-720-4