Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

१८५७ चे स्वातंत्र्यसमर-1857 Che Swatantryasamar by Swa. Vi. Da. Savarkar - Grahakhit Prakashan



१८५७ चे स्वातंत्र्यसमर-1857 Che Swatantryasamar by Swa. Vi. Da. Savarkar - Grahakhit Prakashan
Hard Copy Price: Rs.350   Rs. 332 /   $ 5.98
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
हिंदुस्तानच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सशस्त्र क्रांतीची चळवळ संघटीत करणारे पहिले स्वातंत्र्य सेनानी.

वाड्मय प्रत्यक्षात प्रकाशित होण्यापूर्वी दोन राष्ट्रांच्या शासकांनी जप्त केले असा जगातील पहिला एकमेव लेखक.

स्वदेशाच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ केल्याच्या अपराधाखाली शिक्षा म्हणून मुंबई विद्यापीठाची मिळविलेली बी. ए. ची पदवी गमवावी लागणारा पहिला देशभक्त.

लंडनमध्ये ब्यारिश्तर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ब्रिटीश सम्राटाशी निष्ठा व्यक्त करण्याची शपथ नाकारल्याने ज्याला ब्यारीश्तरी नाकारण्यात आली असा पहिला भारतीय देशभक्त.

परदेशी कपड्यांची निर्भयपणे प्रकट सभेत होळी करणारे पहिले भारतीय राजकीय नेते. हिंदुस्तान राष्ट्राची अभिनव पुनर्बांधणी करण्याच्या हेतूने राष्ट्राच्या सर्वस्पर्शी आणि सर्वांगीण विकासासाठी सुस्पष्ट विचार व्यक्त करणारा पहिला सशत्र क्रांतिकारी. रत्नागिरी येथे स्थानबद्धतेची शिक्षा भोगीत असताना ( १९२४ -१९३७ ) अस्पृशता नष्ट करण्यासाठी आणि जातीविरहित समाजरचना निर्मिण्यासाठी अभूतपूर्व चळवळ करणारा पहिला क्रांतिकारक.

ब्रिटीश न्यायालयाची अधिसत्ता भर न्यायालयात नाकारणारा पहिला बंडखोर क्रांतिकारक नेता. पन्नास वर्षे कालेपाण्याची-दोन जन्मठेपेची शिक्षा झालेला आणि त्या अग्निदिव्यातून पार पडल्यानंतर अखेरपर्यंत राष्ट्रसेवा करणारा अखिल भारतीय राजकीय नेता.
हिंदुस्तानचे संपूर्ण सर्वांगीण स्वातंत्र्य हेच भारताचे राजकीय चळवळीचे ध्येय आहे, असे बेडरपणे प्रकटरित्या घोषित करणारे पहिले राजकीय पुढारी.

कारागृहात स्वरचित काव्य ज्याने काटे आणि खिळे यांच्या लेखणीने कारागृहाच्या भिंतींवर कोरून लिहिले, ते पाठ केले आणि शिक्षा संपून भारतात परतणाऱ्या बंद्यांकडून ते पाठ करवून घेऊन भारतात पाठवले. अशा प्रकारे सहस्रावधी काव्यपंक्ती रचणारा अखिल विश्वातील एकमेव महाकवी.

लंडन येथील अटकेनंतर भारतात आणण्यात येत असताना सशस्त्र पहारेकर्यांच्या नाकावर टिच्चून, समुद्रात उडी मारून मार्सेलिस या फ्रान्सच्या भूमीवर प्रवेश मिळवून अभूतपूर्व खळबळजनक अभियोगाने हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय गाजविणारे पहिले राजकीय क्रांतिकारक नेते.

केवळ योग्यांनाच शोभेल अशा पद्धतीने स्वेच्छेने मृत्यूस सामोरा जाणारा आणि आत्मसमर्पण करणारा एकमेव नि पहिला सशत्र क्रांतिकारक.

तेथे कर माझे जुळती ....!!

"१८५७ चे स्वातंत्र्यसमर" - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला हिंदुस्तानचा इतिहास आवश्य वाचा:
Authors: स्वा. वि. दा. सावरकर 
Publication: ग्राहकहित प्रकाशन
Language: मराठी
Category: ऐतिहासिक
Pages: 462
Weight: 621 Gm
Binding: Hard Cover