Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
More than 75,000 Books, eBooks available!
Phone order call: (91) - 8600 751110
 |  WishList


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
My Profile

 
 
Search:       Advanced Search Back

आयुष्य पेलताना-Ayushya Peltana by Prof. Madhukar Toradmal - Majestic Prakashan



आयुष्य पेलताना-Ayushya Peltana by Prof. Madhukar Toradmal - Majestic Prakashan
Hard Copy Price: Rs.175   Rs. 166 /   $ 2.86
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*

Preview Pages:
व्हिक्टर ह्यूगो (1802-1885) या थोर फ्रेंच कादंबरीकाराच्या ‘ला मिझराब्ल’ (Les Miserables) या जगप्रसिद्ध कादंबरीच्या मूळ कथानकावर आधारलेली, मराठी पार्श्वभूमीवरची ही स्वतंत्र निर्मिती आहे.

जगातल्या सर्वश्रेष्ठ कादंबर्‍यांत ‘ला मिझराब्ल’ या कादंबरीची गणना केली जाते. भावना हेलावून सोडणारे नाट्यमय प्रसंग आणि मनावर खोल व गडद ठसा उमटवणार्‍या बलदंड व्यक्तिरेखा यामुळे ती अविस्मरणीय झालेली आहे. एकोणिसाव्या शतकातील एक अख्यायिका असंच या कादंबरीचं वर्णन करावं लागेल. देश आणि भाषा यांची बंधनं ओलांडून तिनं सारं जग व्यापून टाकलेलं आहे.

चार्लस्‌ विल्बर यानं 1862 साली या कादंबरीबद्दल लिहिलं आहे :

‘जोपर्यंत पृथ्वीला नरकाची कळा आणणारे दुरात्मे या जगात आहेत, जोपर्यंत दुर्बळांची क्रूर पिळवणूक होते आहे, जोपर्यंत भोळ्या-भाबड्या स्त्रिया पुरुषांच्या विषयवासनेमुळे उद्‌ध्वस्त होत आहेत, जोपर्यंत अश्राप बालकांना गुराढोरांप्रमाणं राबवण्यात येत आहे, जोपर्यंत अज्ञान, दु:ख, गरिबी, पिळवणूक आणि भ्रष्टाचार यांचा अंधार या जगात आहे, तोपर्यंत काळोखात प्रकाश देणार्‍या दीपकाप्रमाणे अशा पुस्तकांची जगाला गरज आहे.
Authors: प्रा. मधुकर तोरडमल 
Publication: मॅजेस्टिक प्रकाशन
Language: मराठी
Category: कादंबरी
Pages: 278
Weight: 278 Gm
Binding: Paperback