Summary of the Book
अवघड वाटणारा गणित विषय सोपा करून सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. लेखिका शिला साळवी यांनी ही कामगिरी केली आहे. गणित लवकर कसं सोडवायचं, याची युक्ती त्या सांगतात. त्या म्हणतात., जलद उत्तर द्यायचं असेल, तर आपल्या मेंदूला तशी खास तालीम द्यावी लागेल.
तशी तालीम दिली, तर संख्यांची सवय अधिक चांगली होऊन कागद पेन्सिल घेऊन गणित सोडवत बसण्यापेक्षा तोंडीच उत्तरं देणं शक्य होईल. त्यासाठी त्यांनी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा प्रकरणांमधून त्यांनी गणित लवकर कशी सोडवायची, याविषयी मार्गदर्शन केलं आहे.