Summary of the Book
अलीकडील काळात पक्षीनिरीक्षणाचा छंद वाढतो आहे. त्याविषयी मार्गदर्शन करणारे, पक्षी जीवनाची ओळख करून देणारे विविध लेख, पुस्तके प्रसिद्ध होत आहेत.
या लेखनात डॉ. प्रतिभा सहस्त्रबुद्धे आणि जयंत सहस्त्रबुद्धे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून मोलाची भर घातली आहे. भारतासह वेगवेगळ्या देशांमध्ये दिसणारे पक्षी, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांचे जीवन याविषयीची शास्त्रीय माहिती पुस्तकातून मिळते.
न उडणारे पक्षी, पक्ष्यांची वास्तुकला, स्थलांतर, भारतात येणारे पाहुणे पक्षी, पक्षी आणि पर्यावरण, दुर्मिळ पक्षी, पक्षी संरक्षण अशी विविधांगी ओळख त्यातून होते. छायाचित्रांचा सुयोग्य वापर हे पुस्तकाचे वैशिष्ट्य.