Summary of the Book
आता, मघाशी, आज-काल-उद्या पासून इ.स.पूर्व 532 वर्षे तीस लाख - सात कोटी - दोन अब्ज वर्षांपर्यंत अनेक परिमाणे, अनेक पध्दती. साऱ्यांचा उद्देश एकच _ काळाचे मोजमाप.
व्यक्तीच्या जन्ममृत्यूला कवटाळणाऱ्या, समाज अन् संस्कृतींच्या उदयास्ताला साक्षी असणाऱ्या अन् या साऱ्याच्या अल्याडपल्याड दशांगुळे उरणाऱ्या काळाचे मोजमाप.
कसा झाला काळाच्या संकल्पनेचा उदय? कशा बदलत गेल्या त्याच्या मोजमापाच्या रीती? या साऱ्यांचा रंजक मागोवा - कालगणना