Summary of the Book
सामान्य जीवन जगणाऱ्या माणसाला कोठेही युद्ध करायचे नाही. मोक्षप्राप्ती हा सुद्धा त्याच्या जीवनाचा उद्देश नाही. तो राजा नाही आणि योगीसुद्धा नाही. तर मग गीतेचा त्याच्या जीवनात काय उपयोग आहे; काय संदर्भ आहे, असा संभ्रम निर्माण होऊ शकतो. हे पुस्तक – जनसामान्याला गीता काय शिकवते, ते समजावून सांगण्यासाठी लिहिलेले आहे. पुण्य मिळविण्यासाठी गीतावाचन नसून मार्गक्रमणाचे पाथेय म्हणून गीताज्ञान आहे. जीवनाच्या प्रवासाला निघताना बरोबर घेण्याची शिदोरी गीता आहे. मुलाचे बोट पकडून त्याला शाळेत घेऊन निघालेली माऊली गीता आहे. ‘जिंदगी के साथ भी; जिंदगी के बाद भी...’ अशी चिरकाळाची सोबत गीता आहे.