Summary of the Book
जनप्रवाह या दिवाळी अंकानं सहा वर्ष जपलेली पौराणिक कथांची परंपरा याही अंकात कायम ठेवली आहे. यात आम्रपाली (माधवी कुंटे), कथा विरह मीलनाची (डॉ. चारुशीला ओक), साधन (सुवर्णा दिवेकर), अधुरी एक कहाणी (गुरुनाथ तेंडुलकर) आणि वचनपूर्ती (वसुधा पंडित) या कथांचा समावेश आहे. नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अनिल गोटे या राजकारणातील व्यक्तिमत्त्वांचा वेध घेतला आहे, ‘राजकारणापलीकडचे राजकारणी’ या लेखमालिकेत. दिवाळी अंकाला कथांशिवाय मजा नाही. या अंकाचा कथाविभाग सजला आहे, कॅनव्हास (भारती डिग्गीकर), जंगल (चंद्रकांत भोंजाळ), सोसायटीतील चष्मा महाभारत (सुरेश वंदिले) यांच्या कथांनी. तर ललित विभागात प्रा. प्रवीण दवणे (कायदा कागदावरचा) आणि सुमेध वडावाला (आश्रय) यांचे लेख आहेत.