Summary of the Book
व. पु. काळे यांच्या कथेवर कसा चित्रपट निघाला होता, नंतर त्याच कथेवरून हिंदीत चित्रपट निघाला. "गुळाचा गणपती'च्या वेळी किती अडचणी आल्या होत्या, अशी माहिती देत "रामशास्त्री' चित्रपटापासून अपराध चित्रपटापर्यंत विविध चित्रपटांची माहिती देणारे हे पुस्तक. नेमक्या शब्दात चित्रपटाची माहिती देत, त्याचे वैशिष्ट्य सांगून लेखक संजय दिनकर तो काळ जिवंत करतात. 1950 ते 1990 या काळातील निवडक चित्रपटांचा रसास्वाद व त्याची विशेष माहिती असणाऱ्या लेखांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे.