Summary of the Book
वाचकांनी करमणूक करण्याच्या उद्देशाने लिहिलेल्या या आठवणीपर गोष्टी, लेख आहेत, कृष्ण महादेव टेंग्से यांनी आपल्या मिष्कील शैलीतून मांडल्या आहेत. या छेटेखानी लेखांमध्ये त्यांनी भेटलेली माणसे, आसपास, सामाजिक बदल टिपले आहेत. कल्पनारम्यताही दिसते, 'माझे चित्रगुप्ताशी गुफ्तग,''माझ्या बायकोला ऐकू येत नाही,'वासरू केरसुणी खातंय,''चिकॉद - एक देणे' अशी लेखांची शिर्षक उत्कंठा निर्माण करतात.
पुस्तकात प्राचीन आणि अवार्चीन असे दोन विभाग केले आहेत. प्राचीन विभागात विष्णु, द्रोपदी, भस्मासूर, नारद अशा व्यक्तिरेखाद्वारे विनोदनिर्मिती केली आहे. ' पुराणकाळात विमान बनविण्याची कला फक्त देवांचा चीफ - इंजिनिअर किंवा सुटत ' विश्वकर्मा' यालाच अवगत होती, ' वार उल्लेखलेल्या दोन्ही मद्यपान बंद्या' द्वापार युगातल्या होत्या, ' अशी रंजक वाक्ये प्रसंगानुरूप वाचायला मिळतात. दुसऱ्या विभागाला ' कला बदलला' सारखे लेख समाविष्ट आहेत.