Summary of the Book
आकाशात चमचमणाऱ्या चांदण्या, चांदोबा यांची आपली बालपणापासूनच गट्टी होते. पुढे शाळेत भूगोल शिकताना ग्रह, तारे, सूर्यमंडल यांचा अभ्यास होतो. बातम्यांतून ग्रह, अवकाश यान, चंद्र व मंगळ मोहीम याबद्दल वाचन होते आणि जिज्ञासा जागृत होते.
अनंत अवकाशाची ओळख ज्या खगोलशास्त्रातून होते ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी मोहन आपटे यांचे 'शालेय खगोलशास्त्र ' हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. या शास्त्राचा इतिहास, पाश्च्यात्त्य खगोलशास्त्र, भारतातील खगोलशास्त्राची स्थिती यापासून सुरुवात होते.
खगोलीय मोजमापे कशी घेता, आकाशदर्शन घडविणाऱ्या दुर्बिणी, हबलसारख्या अवकाश दुर्बिणी, ग्रहमाला, आपली धरती म्हणजेच पृथ्वी, चंद्र, लघुग्रह, धुमकेतू, भरती - ओहोटीचे चक्र कसे फिरते, सूर्याला व चंद्राला ग्रहण कसे लागते, सूर्याचे विश्व, ताऱ्यांची ओळख, ताऱ्यांचा मृत्यू, दीर्घिका, आकाशगंगा व तेथे आपण एकटेच आहोत काय, याच सुरु असलेला शोध याची सर्व माहिती यात करून दिली आहे.
सोबत, नकाशे, आकृत्या व आकर्षक छायाचित्रेही आहे. खगोलप्रेमी, जिज्ञासू वाचक यांना हे पुस्तक बसल्याजागी अवकाशाची सफर घडवून आणते.