Hard Copy Price:
25% OFF R 150R 112
/
$
2.70
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
आनंद यादव यांचे 'पाणभवरे’ हे पुस्तक म्हणजे एक शैलीवाद ललितगद्य आहे. स्वत:ला येणार्या अनेक अनुभवांच्याद्वारा आत्मस्वरूप शोधण्याचा, न्याहाळण्याचा प्रयत्न या लेखांमधून आढळतो. लेखांचा घाट प्रामुख्याने एक अनुभव व त्यातून तसेच समाजसंबंध व तीव्र संवेदनशिलता ही या लेखनाची वैशिष्ठ्ये आहेत. या लेखांतून लेखकाने गावाकडचा परिसर, तिथल्या व्यक्ती, सगेसोयरे, तसेच बदलती सामाजिक-आर्थिक परिस्थिती इत्यादीचे दर्शन घडवले असले तरी या सर्वांतून दृगोचर होते ती शहरी संस्कृतीच्या वातावरणाशी जुळवून घेताना तिच्यात रूजताना लेखकाच्या मनाची झालेली तडफड आणि मनाशीच कराव्या लागलेल्या संघर्षाची कहाणी. या सर्व लेखनांत बदलत्या वास्तवाचे भान आहे. आजच्या आधुनिक जीवनातील मानसिक गुंतागुंत आहे. क्षणोक्षणी जाणवणारी असुरक्षितता, धपापलेपण आहे. यांत्रिक जीवनातील कृत्रिमता आहे. पांढरपेशा प्रतिष्ठा जपताना होणारी मनाची तगमग आहे. संस्कारांनी गिरवलेली, न पुसली जाणारी वलये आहेत. वास्तवाचे निदान करणारी शोधदृष्टी आहे. तरल, भावस्पर्शी, संवेदनेची वीण यादवांची भाषा संवेदना, काव्यात्मता, तरलता अनुभवातील चैतन्य उत्तमपणे पेलू शकते. असा अनुभव या लेखातून येतो.