Summary of the Book
"गोष्टी घराकडील" या पुस्तकात राजेंद्र बनहट्टी यांनी नागपुरातील त्यांच्या बालपणीची मनोरम्य स्मृतिचित्रे रंगविली आहेत. नागपूरचे घर, त्या घरातील सर्वांसोबतच्या आठवणी, काही प्रसंग या सर्वांचे चित्रण बनहट्टी यांनी या पुस्तकात केले आहे. राजेंद्र बनहट्टी यांनी कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, स्फुटलेखन, नाटक असे विविध प्रकारचे लेखन केले असले, तरी सारे मराठी रसिक त्यांना प्रामुख्याने ओळखतात, ते अव्वल दर्जाचे कथालेखक आणि कादंबरीकार म्हणून. गंगार्पण, कृष्णजन्म, लांडगा, युद्धपर्व, मध्यांतर यांसारखे त्यांचे कथासंग्रह मराठी साहित्यात उत्कृष्ट म्हणून गणले जातात.
त्यांचा जन्म नागपूरला झाला, नंतर ते पुण्यात स्थायिक झाले. त्यांच्या नागपूरमधील वास्तव्यातील आठवणी या पुस्तकात वाचायला मिळतात. राजेंद्र बनहट्टी यांच्या गंगार्पण, कृष्णजन्म, लांडगा यांना महाराष्ट्र सरकारचे सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाचे पुरस्कार मिळाले आहेत.