Hard Copy Price:
24% OFF R 50R 38
/ $
0.49
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
प.पू.सौ. शकुंतलाताई आगटे यांचा ‘साधना सर्वस्व’ हा लघुग्रंथ म्हणजे परमार्थाच्या मार्गाने प्रवास करू इच्छिणाऱ्या सर्वच जणांना अमूल्य मार्गदर्शनपर ठरणारा असाच आहे.
या मार्गाने सजगतेने प्रवास करणाऱ्या, साधना करणाऱ्या व अध्यात्मग्रंथांचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात, या मार्गाची वाटचाल, गंतव्य, कुंडलिनी शक्ती, साधना आणि आपले आचरण या साऱ्याच गोष्टींसंदर्भात असंख्य प्रश्न निर्माण होतात. अर्थातच या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्याशिवाय जिवाला स्वस्थता लाभत नाही. मात्र अध्यात्माचा देखील बाजारच अधिक असलेल्या सध्याच्या युगात, या विषयाबद्दल विशुद्ध असे अनुभवाधिष्ठित आणि कृपासामर्थ्ययुक्त मार्गदर्शन मिळणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. प.पू.सौ. शकाताईंसारख्या अत्यंत सामर्थ्यसंपन्न स्वनामधन्या सद्गुरुकन्याच असे अवघड कार्य लीलया संपन्न करू शकतात, जिज्ञासू साधकांच्या प्रश्नांचे, शंकांचे मूलत: समाधान करू शकतात; याचा यथार्थ प्रत्यय या पुस्तकाच्या वाचनाने प्रत्येकाला निश्चितच येईल.
श्रीसद्गुरुकृपा, साधना, आसन, यम-नियमांचे पालन, विवेक आणि वैराग्य यांची प्राप्ती, साधना करताना येणारी विघ्ने, शक्तिजागृतीची लक्षणे, साधकावस्थेतील उत्तरोत्तर प्रगतीच्या अवस्था, भगवत्प्रेमभक्ती आणि त्याचबरोबर जीवाबद्दलच्या अपार करुणेपोटी असीम कृपादान करणारे आपले दयाघन श्रीसद्गुरु प.पू.योगिराज श्री.मामा आणि आपली सर्वश्रेष्ठ, सामर्थ्यसंपन्न सद्गुरु-परंपरा या सर्वांबद्दल तेरा वेगवेगळ्या छोट्या छोट्या प्रकरणांतून प.पू.सौ.शकाताईंनी अत्यंत अनमोल असे मार्गदर्शन केलेले आहे.
साधकावस्थेच्या प्रारंभीच्या काळातच नव्हे, तर नित्यच वाचन करून याच्या अखंड चिंतनात राहावे, असेच खरे तर या लघुग्रंथाचे स्वरूप आहे.