Hard Copy Price:
R 180
/ $
2.31
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
पौगंडावस्था म्हणजे जीवनातील महत्त्वाचा संक्रमणकाल. वेगवान शारीरिक वाढीचा व भावनिक संघर्षाचा हा कालखंड. वसंताचे आगमन व प्रेमाची हुरहुर टिपणारा समय. एकीकडून चैतन्य व उत्साह ओसंडू लागतो; तर दुसरीकडून जिज्ञासा, कुतूहल, शंका, भीती यांचा गोंधळ मनात उडालेला असतो. जीवनाला दिशा देणार्या परीक्षानाही याच वेळी तोंड द्यायचे असते. अशा या झपूर्झावस्थेत असणार्या मुलामुलींना मार्गदर्शन करणारा हा एकमेव ग्रंथ.
व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्याचे हे वय. या वयात कुटुंबजीवन-शिक्षणाची नितांत गरज असते. निसर्गाची योजना व स्वतःच्या शरीरातील बदल समजून घेणे, गैरसमज दूर करणे, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राखणे, निकोप संकल्पनांद्वारे समाजाचा एक सुदृढ घटक निर्माण करणे अशा सर्वांगीण हेतूने डॉ. विठ्ठल प्रभू यांनी हा ग्रंथ लिहिला आहे.
निसर्गाने शरीराला पूर्णत्वाकडे नेले असले, तरी पौगंडावस्थेतील मुलामुलींना बौद्धिक परिपक्वता व अनुभवांची जोड प्राप्त व्हायला अवकाश लागतो. यासाठी त्यांना पालक व शिक्षक यांचे मार्गदर्शन हवे असते. `तारुण्याच्या उंबरठ्यावर’ या ग्रंथात केवळ वयात येणार्या मुलामुलींसाठीच नव्हे, तर त्यांना घडविणारे पालक व शिक्षक यांनाही उपयोगी वाटणारी अशी भरपूर माहिती दिली आहे.