Summary of the Book
शेतकरी संस्कृतीशी निगडित असलेल्या प्राध्यापक शंकर सखाराम यांच्या या पुस्तकात ग्रामीण जीवनाशी संबंधित लेख येतात. लेखक शहरात राहत असला तरी त्याची नाळ ग्रामीण भागाशी घट्ट आहे. ललित शैलीतील हे लेख ग्रामीण संस्कृतीचे चित्र नेमकेपणाने उभे करतात. त्यांची शब्दसंपदा खूप छान आणि प्रसन्नही आहे. कुठलाही लेख कंटाळवाणा होत नाही. कोकणातील निसर्ग, तेथील लोकजीवन प्रभावीपणे मांडत लेखक इथे जे चिंतन करतो ते वाचकाला मंत्रमुग्ध करते.