Hard Copy Price:
R 20
/ $
0.26
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
आधुनिक चीनबाबत सर्वांगीण माहिती देणारे `आम्ही पाहिलेला चीन’ हे मराठीतले पहिलेच पुस्तक आहे. आपल्या दौर्याची हकीकत सांगत असता लेखिकेने चीनची भौगोलिक परिस्थिती, सांस्कृतिक इतिहास, भारताशी प्राचीन संबंध यांची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
माओप्रणीत साम्यवादी क्रांती 1949 मध्ये सफल झाल्यानंतर जमिनीचा प्रश्न, बेकारांना आणि भूमिहिनांना काम व अधिक धान्योत्पादन आदी समस्या सोडविण्यासाठी कम्यून्सची स्थापना करण्यात आली. त्यापैकी काही कम्यून्स्चे प्रत्यक्ष निरीक्षण करून त्यांचा सांगोपांग परिचय या पुस्तकात करून दिलेला आहे.
चीनची सांस्कृतिक क्रांती, तिचे शिक्षणावर व उत्पादनावर झालेले परिणाम, माओच्या मृत्यूनंतरचा सत्तासंघर्ष या प्रश्नांचा प्रसंगवशात ऊहापोह या पुस्तकात करण्यात आलेला आहे. आधुनिक चीनच्या राजकीय आणि आर्थिक जडणघडणीचे चित्रही त्यात उभे केलेले आढळेल.
तसेच चिनी नागरिकांचे जीवन, त्यांच्या आशाआकांक्षा, त्यांच्या स्वातंत्र्यावरील मर्यादा यांबाबतचे काही निष्कर्ष यात वाचायला मिळतील. चीनची प्रचंड भिंत,राजमहाल, प्रतिबंधित नगरी यांसारख्या वास्तूंचे ओघाने आलेले वर्णनही रोचक वाटेल.
समाजपरिवर्तनासाठी हिंसक साधने वापरून व नागरिक स्वातंत्र्यावर मर्यादा घालून चीनने आपला भाकरीचा प्रश्न सोडविला आहे. साधनशुचितेचा मार्ग न सोडता गांधींच्या भारताला लोकशाही पद्धतीने ही समस्या सोडविता येईल का, असाही एक प्रश्न शेवटी लेखिकेने उपस्थित केला आहे.