Summary of the Book
रिलायन्स फाउंडेशन स्कूल लोधिवली (मराठी माध्यम) या शाळेत गेल्या दोन दशकांहून अधिक काळ इतिहास शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या या अभ्यास लेखकाने ऐतिहासिक घटनांवर आधारित दिनविशेष स्वरुपाची पुस्तके लिहिली आहेत. 'साहित्यिकांची मांदियाळी' या पुस्तकांत मराठी साहित्यिकांना, लेखकांना दिनविशेषाच्या माध्यमात गुंफवून त्यांनी मराठी संदर्भ साहित्य निर्माण केले आहे. 'मूर्ती लहान पण कीर्ती महान' अशा प्रकारचे हे पुस्तक... 'थोडक्यात... पण महत्वाचे...' अशा प्रकारांत नक्कीच मोडेल.
श्री. नझरेकर सरांनी 'इतिहासाच्या पाऊलखुणा' या आपल्या 'यू टयूब चॅनलच्या' माध्यमातून परिसरातील लहान-मोठ्या गावांचा, शरांचा ऐतिहासिक वेध घेतला आहे. तसेच इतिहासाच्या पाठ्यपुस्तकावर आधारित काही पाठांचे video सुद्धा त्यांनी तयार केले आहेत. या खेरीज संयुक्त महाराष्ट्राच्या हिरक मोहत्सवानिमित्त पाच हजार मराठी साहित्यिकांचा चरित्रकोश प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे.