Summary of the Book
चिंतनशील वृत्तीचा गंध घेऊन आलेले हे ललित लेखन वाचकांना अस्वस्थ आनंद देऊ शकेल. माणसाचे मन, त्यातल्या नानाविध वृत्ती व प्रवृत्ती, संगती आणि विसंगती यांचा वेध घेण्याचा प्रयत्न निर्मलकुमार फडकुले यांनी सहजतेने केला आहे. त्यांच्या अंतर्मुखतेची व संवेदनशीलतेची साक्ष देणारे हे ललित लेख वाचकांच्या पदरात प्रसन्नतेबरोबरच विचारगंभीरतेचे काही क्षण निश्चित टाकतील.
चिंतनाच्या विविध वाटा चोखाळणार्या या लेखकाची शब्दकळा प्रवाही आणि प्रभावी आहे. त्याची जीवनविषयक जाणीव प्रगल्भ असल्याचा प्रत्यय या लेखनातून येतो. विविध विषयांवरील हे उत्कट चिंतन चिंतनाच्या अनेकविध वाटांचे दर्शन घडवते.
आपल्या अस्वस्थ मनाचे पदर उलगडून दाखवणारे हे ललितलेख वाचकांना काहीतरी मन:पूर्वक सांगतील.