Summary of the Book
संगणक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यावर लेखन करणाऱ्या दीपक शिकारपूर यांचे हे पुस्तक नव्या साधनांची सोप्या शब्दांत माहिती देते. डिजिटल कॅमेरा, पेनड्राईव्ह, जीपीएस, इंटरनेट आदीची माहिती ते यामध्ये देतात. त्याचबरोबर या साधनाचे भविष्यातील रूप कसे असेल याचीही माहिती देतात. संगणक क्षेत्रातील क्रांतिकारी उत्पादने या प्रकरणात ते रंजक भाषेत आगामी काळातील प्रगतीचा वेध घेतात.