Summary of the Book
रामायण आणि महाभारताप्रमाणेच बृहत्कथा हे एक महाकाव्य आहे, याकडे लक्षवेधून लेखक राजेंद्र खेर यांनी या महाकाव्याचा नायक वत्सदेशाचा महापराक्रमी राजा उदयन याच्यावर ही कादंबरी बेतली आहे. उदयन हा पांडववंशातील परीक्षितापासून पाचव्या पिढीतील राजा होता.
तो संगीतकार, कलावंत, गुणग्राही होता. ही कहाणी जशी उदयनची आहे, तशीच ती स्वप्नसुंदरी वासवदत्ता हिचीही आहे. पद्मावती, राजा प्रद्योत, सेनापती रूमण्वान, विदुषक वसंतक ही पात्रेही या रंगमंचावर आहेत. उदयन राज्याच्या जीवनातील नाट्याबरोबरच डाव-प्रतिडाव, हेरगिरी, साम्राज्य-स्पर्धा यांचे दर्शनही घडते; तसेच प्राचीन भारतीय संस्कृती, सभ्यता, समाजरचना, आचार - विचार यांचे दर्शनही होते.