Summary of the Book
पूर्वायुष्यात स्वातंत्र सैनिक असणा-या डॉ. बारलिंगे यांनी हैद्राबादच्या मुक्ती संग्रामानंतर शिक्षण क्षेत्राला वाहून घेतले. तत्त्वज्ञानाच्या आंतर्देशीय पार्श्वभूमीवर एक तत्त्वचिंतक म्हणून लौकिक मिळवला. त्यानिमित्ताने इंग्लंड, ऑस्टेलिया व युगोस्लावव्हिया या देशांमध्ये त्यांचे वास्तव झाले. या काळातील त्यांच्या आठवणी आपलासमोर आगळेवेगळे अनुभवविश्व उभे करतात. संवेदनशील मनाने टिपलेले जीवनाच्या विविध अंगांचे अनुभव आणि त्यांची चिंतनशील वक्तिमत्त्वाने केलेली उकल असे एक नवीन रूप या आत्मकथेत पाहायला मिळते.