Summary of the Book
अखंड जेथे सत् प्रीतीचा,मांगल्याचा गंध दरवळे, आवडते मज घर हे असले,जयात सारे त्रिभुवन भरले चार भिंती, एक छप्पर, दोन दारे-खिडक्या एवढेच म्हणजे घर नाही, तर घर म्हणजे भावभावनांचे दृश्यरूप असते. कवीच्या मनातील घराविषयीच्या संकल्पनांना शब्दरूप देणाऱ्या कविता वाचकांना स्वप्नातील घराचा प्रत्यय देतात, कधी वास्तवाचे भान देतात. "मराठी कवितेतील घर' या पुस्तकाच्या निमित्ताने शीला निपुणगे यांनी मराठी आद्यकवी मुकुंदराजांपासून ते आजच्या संदीप खरे, संतोष पवार यांसारख्या कवींची घरविषयक कविता निवडून त्यांची एकत्र बांधणी केली आहे. मराठीतील हा एक वेगळा प्रयोग आहे. संशोधनाच्या दृष्टिकोनातून या कवितांची निवड, मांडणी आणि त्यावरील विवेचन हा जिकिरीचा आणि रसिकतेचा प्रत्यय देणारा प्रयोग आहे.