Summary of the Book
पॅथॉलॉजीच्या प्राध्यापक असलेल्या डॉ. कल्पना कुलकर्णी यांच्या ललितलेखाचं हे पुस्तक विविध विषयांना स्पर्श करणारं आहे. संवेदनशीलतेनं त्यांनी अनेक अनुभव टिपलेले आहेत. नोकरी आणि घर सांभाळताना स्त्रीची होणारी धांदल, तसेच दैनंदिन जीवनातील विविध व्यक्ती आणि त्यांच्या वागण्यातील गमतीजमती; तसेच मुलीबरोबरच्या नात्यातील नाजूक भावबंध त्या नेमकेपणानं मांडतात. यातील काही लेख सकाळच्या मधुरा पुरवणीत प्रसिद्ध झालेले आहेत. अनिल अवचट यांनी या लेखसंग्रहाला मार्मिक प्रस्तावना दिली आहे.