Summary of the Book
देशात महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील खाद्य संस्कृती भिन्न आहे. वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या कशा तयार करायच्या याची कृती वैजयंती केळकर यांनी 'भाज्या आणि भाज्यांचे अनेक पदार्थ' मधून दिली. भाज्या निवडणे, मसाले कसे वापरावेत, तेल किती घालावे, हेही यात सांगितले आहे. बटाटा, कांडा, मटार, फ्लॉवर, भेंडी, कंद, कणस, टोमॅटो, गाजर अशा भाज्यांपासून तयार केलेल्या भाज्यांची कृती यात दिली आहे. कमला गोडबोले यांनी 'महाराष्ट्रीय खास पदार्थ' मधून विविध चटण्या, कोशिंबिरी, भाज्या, आमटी- पिठले, खमंग भात, खमंग पक्वान्न, पुडिंग, मधल्या वेळेचे पदार्थ, धिरडी, सुपारी,मेतकूट लोणची - मिरच्या, पापड अशा खास महाराष्ट्रीय पदार्थाच्या पाककृती यात आहे. २५ जणांसाठी भोजनाच्या सामनाची यादीही आहे. यातील तिसऱ्या 'भात, पुलाव व्हेज बिर्याणी' या पुस्तकात वंदना वेलणकर यांनी भाताचे तिखट व गॉड प्रकारातील अनेक कृती सांगितल्या आहेत. व्हेजिटेबल बिर्याणी ही घरी कशी करावी, हे यातून समजते.