Hard Copy Price:
R 180
/ $
2.31
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
नवीन लग्न झालेली देखणी सुर्वंता पहिल्यांदाच नवऱ्याबरोबर,मल्हारीबरोबर ऊसतोडणीच्या सीझनला जाते; पण तिथे गेल्यावर ऊसतोडणी कामगारांचं मुकादमाकडून होणारं शोषण पाहून ती अस्वस्थ होते. त्यात मुकादमाच्या वासनेची शिकार झाल्यानंतर तर तिची ही अस्वस्थता वाढते. आपली मुलंबाळंही या शोषणाच्या चक्रात अडकणार, हा विचार तिला हलवून टाकतो. त्यातच तेजराम नावाचा तरुण जमीनदार तिला जाळ्यात ओढू पाहत असतो. शोषणाच्या या चक्रातून बाहेर पडण्यासाठी ती तेजरामला वश होते. तेजराम तिला आणि तिच्या नवऱ्याला त्याच्या शेतावर कामाला ठेवतो; पण तेजरामशी असलेल्या चोरट्या संबंधामुळे तिचं मन तिला खात असतं आणि मल्हारीला हे कळलं तर काय होईल, ही भीतीही असते. शेवटी जे घडू नये ते घडतं आणि सुर्वंताच्या स्वप्नांचा पार चेंदामेंदा होतो. सुर्वंताच्या माध्यमातून ऊसतोडणी कामगारांच्या जिवनाचं वास्तव चित्रण करणारी, मनाला चटका लावणारी कादंबरी.