Summary of the Book
रासायनिक खतांच्या विपरीत परिणामास तोंड देण्यासाठी बायोपेस्टीसाईड अत्यावश्यक असल्यामुळे लिहिलेले हे पुस्तक ६ महिन्यांतच विकले जाते यातच पुस्तकाची महनियता दडली असून लेखक रविंद्र काटोले यांनी ३१ प्रकरणात बायोपेस्टीसाईड, मित्रकीड, उपयुक्त वनस्पतींची माहिती दिली असून दुसरी आवृत्ती अधिक माहितीने भरगच्च अशी प्रकाशित केली आहे. लसूण, लिंबारा, मिरची आदि वनस्पतींची दिलेली माहिती परिपूर्ण असून ज्ञानात भर घालणारी आहे. सर्वसामान्य शेतक-यांना परवडणारे हे पुस्तक प्रत्येक शेतक-यांच्या घरी हवेच हवे, असे नमूद करावेसे वाटते.