Summary of the Book
जीवनात प्रत्येकाला यशस्वी व्हायचे असते. यश, पैसा, कीर्ती मिळविण्याचे स्वप्न अनेक जण बघतात; पण त्यासाठीचा मार्ग सापडणे आवश्यक ठरते. ज्यांना यशस्वी जीवनाचे सूत्र गवसत नाहीत ते सामान्य भविष्य बदलणे आपल्याच हाती आहे. केवळ आपलेच नाही, तर आपण जेथे करतो ती संस्था, कंपनी, उद्योग, कार्यक्षेत्र, समाज यांचेही भविष्य आपण घडवू शकतो, असा विश्वास दिला आहे शिवराज गोर्ले यांनी 'बदला तुमचं भविष्य'तून आपले आयुष्य बदलण्यासाठी, असामान्य यश मिळविण्यासाठी अशक्य ते शक्य करून दाखविण्यासाठी तीन क्रांतिकारी सिद्धांत यात सांगितले आहेत. विविध क्षेत्रांत मोठे बदल घडविणाऱ्या नामवंतांची उदाहरणे यात आहेत. ते वाचून वाचकांनाही स्वतःचे भविष्य, आयुष्य बदलण्यास चालना मिळेल.