Summary of the Book
मी लिहिलेल्या घाटदार व्यक्तिचित्रांचा हा पाचवा संग्रह. ललित अंगाची जिंदादिल व्यक्तिचित्रं लिहिण्यात मी कुठली यत्ता गाठली, ते हा संग्रह सांगेल.
व्यक्तिचित्रांचे माझे पाचही संग्रह वाचले तर शंभर लेखक-कलावंतांच्या जिव्हाळ्याच्या गाठीभेटी घेतल्याचा आनंद वाचकांना होईल.
पं. कुमार गंधर्वांपासून बालगंधर्वांपर्यंत, कवी कुसुमाग्रजांपासून सौ. किशोरी आमोणकरांपर्यंत आणि पु. ल. देशपांडेंपासून, व्ही. शांतारामांपर्यंत सर्व क्षेत्रांतली गुणी माणसं मी हेरली आणि त्यांच्याविषयी जिवलगपणे लिहिलं. पराक्रमी माणसं खाजगी जीवनात कशी दिसली, ते मी अलिप्त पण आस्वादक नजरेनं टिपलं आहे.
रवींद्र पिंगे