Hard Copy Price:
25% OFF R 100R 75
/ $
0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
जगातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणाऱ्या नोबेल पुरस्काराच्या यादीतील स्त्रियांचं कर्तृत्व मीरा सिरसमकर यांनी 'नोबेल ललना भाग २' या पुस्तकात शब्दांकित केलं आहे. शिरिन इबादी, वँगरी मुटा मथाई, एल्फ्रिड येलिनेक, लिंडा बक, डॉरि लेसिंग, फ्रांस्वाज बारे सिनूस्सी, एलिनॉर ऑस्ट्रॉम, अदा योनॅथ, एलिझबेथ ब्लॅकबर्न, कॅरोल ग्रेडर, हॅर्टा म्यूलर, एलेन जॉन्सन सरलिफ, लीमा बोवी, तवक्कुल करमान या महिलांची ही यशोगाथा!
पुस्तक वाचताना या स्त्रियांच्या कार्यकर्तृत्वाचा मोठा पट उलगडत जातो. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या या स्त्रियांचा सामायिक धागा म्हणजे त्यांची आत्मप्रेरणेने काम करण्याची वृत्ती. स्त्री म्हणून सर्वसमावेशक विचार करण्याची वृत्ती, चिकाटी, सामाजिक परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याचे धाडस, असे अनेक पैलू या पुस्तकातून उलगडले आहेत. अनेकींना सामाजिक बंधनांना तोंड द्यावे लागले. स्त्री म्हणून होणारा अन्याय सहन करावा लागला. या अन्यायाला न जुमानता आपल्या कामात, संशोधनात त्यांनी खंड पडू दिला नाही. त्यात त्या यशस्वी झाल्या. ध्येयवेडय़ा महिलांची यशोगाथा असेच या पुस्तकाचा उल्लेख करावा लागेल.