Summary of the Book
विविध क्षेत्रांत महत्त्वाचं काम करणाऱ्या व्यक्तींविषयीच्या लेखांचं हे पुस्तक. यात एकंदर बारा लेख असून ते १९९० ते २००० या काळात लिहिलेले आहेत. म्हणजे ते आता पुस्तकरूपाने प्रकाशित व्हायला तब्बल एक तपाहूनही अधिक काळ लोटला आहे.
परदेशात शिकून डॉक्टर होण्याचा पहिलावहिला मान मिळवणाऱ्या आनंदीबाई जोशी, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात राहून आदिवासींची सेवा करणारे डॉ. अभय-राणी बंग, मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे दिग्दर्शक राम गबाले, समाज कार्यकर्ते मामा खांडगे, पूना गेस्ट हाऊसचे चारुदत्त सरपोतदार, बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, विदर्भातल्या पहिल्या बीडीओ प्रभाताई जामखिंडीकर यांच्या कर्तृत्वाची ओळख करून देणारे हे पुस्तक आहे.