Summary of the Book
एखादी संस्था, कंपनीची प्रगती, यश त्यांच्यापुढील उद्दीष्ट साध्य करण्यात असते. ध्येय पूर्ण करण्यात कंपनीचे नेतृत्व करणाऱ्यांचा मुख्य सहभाग असतो, तसेच त्याच्या हाताखालील सहकारी प्रत्यक्ष काम करीत असतात. त्यांना मार्गदर्शन करण्याचे, दिशा दाखवण्याचे काम प्रमुख करत असतो. जी व्यक्ती या अधिकारपदी असते तिच्यामध्ये नेतृत्व करण्याचे गुण असावे लागतात.
ते कसे साधता येईल याविषयी आरती गुरव यांनी 'Leadership + Teamwork = Success' यात सांगितले आहे. नेतृत्व कसे करावे, त्याच्यातील गुण, वैशिष्ट्ये, सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जाण्याचे कौशल्य, नवनवीन कल्पना राबविण्याचे धाडस, वेळेत व गुणवत्तेनुसार काम पूर्ण करण्याचा विश्वास या गोष्टींमुळे नेतृत्व फुलते. रामायाणापासून लग्नापर्यंत, तसेच महात्मा गांधी, मदर तेरेसा, इंदिरा गांधी, बिल गेट्स, धीरूभाई अंबानी,
महेंद्रसिंग धोनी आदींच्या उदाहरणांसह त्यांच्यातील नेतृत्व गुण विशद केले आहेत..