Summary of the Book
नर्मदा परिक्रमा करताना येणारे अनुभव आजवर अनेकांनी सांगितले आहेत. हे अनुभव असे असतात, की पुन्हा पुन्हा ऐकत राहावेत. म्हणूनच सुहास डसाळकर यांचे हे पुस्तक ताजेतवाने अनुभव सांगणारे आणि मार्गदर्शक ठरले आहे. परिक्रमा सुरू करण्यापूर्वी व परिक्रमा करताना कोणकोणत्या दक्षता घेणे आवश्यक आहे, याची माहिती त्यांनी सांगितली आहे.
परिशिष्टामध्ये मुक्कामाचे ठिकाण, भोजन व निवास व्यवस्था, वाटेत लागणारी गावे आणि प्रेक्षणीय स्थळे यांची माहितीही मिळते. किती तासात किती अंतर पार करता येईल, त्यासाठी शारीरिक, मानसिक बळाची आवश्यकता ही महत्वाची माहिती समजते. परिक्रमा करतेवेळी आलेले अनुभवही लक्षवेधी आहेत.