Hard Copy Price:
R 45
/ $
0.58
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
औषधे आपल्या जीवनाचे एक अपरिहार्य आणि अविभाज्य अंग आहे. औषध हे दुधारी शस्त्र आहे. योग्य औषध योग्य प्रकारे दिले गेल्यास, घेतले गेल्यास उपकारक ठरते. ह्याकरिता त्याची योजना समजून उमजून करावी लागते; त्याच्याविषयीचे शिक्षण असावे लागते. औषधांचे शोध, त्यांच्या क्रिया, त्यांचे प्रतिकूल परिणाम, औषधे आणि शरीर ह्यांचा संबंध, औषधांची गुणवत्ता, औषधे घेताना घ्यावयाची काळजी, मादक द्रव्ये इत्यादी अनेक विषय; तसेच औषधांचे सामाजिक व आर्थिक संदर्भ, औषधांच्या किंमती, त्यांची निर्मिती, राष्ट्रीय औषधी धोरण इत्यादी जिव्हाळ्याच्या विषयांची चर्चा या पुस्तकात केली आहे. औषधांविषयीची सर्वांगीण व संदर्भासहित एकत्रित माहिती देणारे असे पुस्तक मराठीत प्रथमच प्रकाशित होत आहे. या पुस्तकाचे लेखक डॉ. अरविंद गोडबोले हे अनेक रुग्णालयांत मानद वैद्यकीय तज्ज्ञ असून `डायाबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया’ ह्या संस्थेच्या शास्त्रीय विभागाचे ते अध्यक्ष आणि `जर्नल ऑफ डायाबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया’चे ते माजी प्रमुख संपादक होते. वैद्यकशास्त्र, इतिहास, साहित्य, विज्ञान इत्यादी विषयांवर त्यांचे शोधनिबंध, स्फुटलेख आहेत. मधुमेह, वृद्धांचे प्रश्र्न’, स्वा. सावरकर, शिखांचा इतिहास ह्यावर त्यांनी ग्रंथलेखन केले असून त्यांचा अनेक सामाजिक संस्थांशी निकटचा संबंध आहे.