Summary of the Book
सुदृढ आरोग्य हे सुखी, समाधानी जीवनाचा मंत्र आहे. व्यायाम, आहार, विहार, सकारात्मक दृष्टीकोन यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पण काही वेळा शरीराचे तंत्र कोठेतरी बिघडते आणि आजाराला निमंत्रण मिळते.
आरोग्यमन जीवन जगण्यासाठी डॉ. अनिल गायकवाड यांनी औषधांविना आरोग्य'मधून मार्गदर्शन केले आहे. मधुमेह, हृदयविकार, श्वासव्याधी, ओबेसिटी, ब्रेन अॅटॅक, निद्रानाश, नाकाचे विकार, गुडघेदुखी, मज्जासंस्थेचे विकार, कर्करोग, एड्स, संधिवात, नखांचे आरोग्य आदी रोगांविषयी माहिती त्यांनी दिली.
त्याचप्रमाणे सतत १४ दिवस झोप लागत असल्याचा अज्ञात रोग, अॅलोपेशिया, विरुद्ध आहार, केसांची निगा, मध, हळद, गुलाब, तृणांकुर, रस, वेखंड, दुध, अननस, डाळिंब यांचे आरोग्यासाठी उपयुक्तता, काय खावे काय टाळावे, स्वयंपाकघरातील स्वच्छता, सौंदर्यवर्धन, चौल संस्कार, बालमृत्यू, हृदयविकारावरील शल्यचिकित्साविरहित उपचार पद्धती, मुलांच्या बुद्धीवर्धनासाठीचा उपाय अशा विविधांगी विषयांवरील लेखकाने मार्गदर्शन केले आहे.