Summary of the Book
विमान अपघात हा जागतिक स्तरावरील गंभीर प्रश्न आहे. या अपघातांची कारणेही वेगवेगळी आहेत. विनायक पुरुषोत्तम डावरे यांनी अशा काही अपघातांची माहिती या पुस्तकात दिली आहे. पुस्तकाचे चार भाग करण्यात आले असून, पहिल्या भागात विमान प्रवासातील उत्क्रांती व प्रत्यक्ष फ्लाइंग, सन २००० मध्ये बहारीनमध्ये झालेला विमान अपघात, अपघाती विमानांचा घटनाक्रम, हवाई सुरक्षितता या मुद्द्यांवर भर दिला आहे.
दुसरा भाग जर्मनीत सन २००२ मधील विमान अपघाताचे उदाहरण करून चर्चा करणारा आहे. हा अपघात दोन विमानांची टक्कर होऊन झाला होता. तिसरा भाग सन १९७७ मध्ये दोन जंबो - जेट्सची झालेल्या टक्करीवर प्रकाश टाकणारा आहे. चौथ्या भागात जपानमध्ये विमानांच्या वाचलेल्या टक्करींची माहिती देण्यात आली आहे.