Summary of the Book
बुद्धिमापनाची परीक्षा म्हणजे नेमके काय, याबाबत स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांमध्ये बऱ्याचदा संभ्रम आढळतो. वा. ना. दांडेकर यांनी या पुस्तकात या विषयाचे मार्गदर्शन केले आहे. पुस्तकाच्या पहिल्या विभागात बुद्धिमापन कसोट्यांचे स्वरूप, वर्गीकरण, समान संबंध, क्रम ओळखणे, कूट प्रश्न, सूचनापालन व आकलन याबाबत सांगितले आहे.
गटाशी जुळणारे पद, समान पद ओळखणे, तर्क व अनुमान, सांकेतिक भाषा, गणितातील कोडी, अभाषिक कसोट्या, सांकेतिक चिन्हांचा वापर, मेंदूला खुराक, तर्क व अनुमान, घन आकृतींची रचना याविषयी मार्गदर्शन केले आहे. दुसऱ्या भागात 'निर्णयप्रक्रिया व समस्या समाधान' हा विषय समाविष्ठ केला असून, तिसऱ्या विभागात प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे.