Summary of the Book
अलीकडच्या पाच-दहा वर्षांत दूरदर्शनमुळे ‘लोककलां’च्या नावाखाली बरेच काही सादर केले जाते. परंतु लोककला म्हणजे नक्की काय, याचे भान सादरकर्त्यांना फारसे दिसत नाही. गोंधळ-जागरण, भारूड, तमाशा, वग या सगळ्यांचा समावेश सरसकट एकसूत्रात केला जातो. परंतु त्यातील भेदाभेदांचे भान असलेले कमी वेळा दिसते.
डॉ. प्रकाश खांडगे यांनी ‘भंडार-बुका’ या पुस्तकाद्वारे हे भान आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी प्रामुख्याने प्रायोगिक अंगाने विधिनाटय़ आणि भक्तिनाटय़ यांचा विचार दोन्हीतील काही विधांच्या आधारे ‘भंडार-बुका’ या पुस्तकात केला आहे.
या पुस्तकात जागरण, गोंधळ व भराड ही विधिनाटय़े; तर कीर्तन, भारूड, दशावतार, लळित ही भक्तिनाटय़े म्हणून त्यांचा विचार केला आहे. विधिनाटय़ आणि भक्तिनाटय़ यांच्या सीमा खांडगे यांनी नेमकेपणाने सांगितल्या आहेत.