Summary of the Book
सन २०१४ मध्ये भास्कराचार्य यांच्या जन्माला ९०० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त गणितशिरोमणी भास्कराचार्य यांनी ओळख सर्वांना व्हावी म्हणून ही पुस्तकरूपी मानवंदना.
सिद्धांत शिरोमणी ह्या भास्कराचार्यांच्या प्रख्यात ग्रंथात प्रश्नाध्याय नावाचे एक प्रकरण आहे, त्यामध्ये 58 व्या श्लोकात भास्कराचार्यांनी आपले जन्मवर्ष स्पष्टपणे सूचित केले आहे.
तो श्लोक असा,
रसगुणपूर्णमही समशकनृपसमये अभवत् ममोत्पत्ति:
रसगुणवर्षेण मया सिद्धांत शिरोमणी रचित : रसगुण पूर्ण माही आणि रसगुण ह्या वस्तुत: संख्या आहेत. त्यातील शब्दांचे अर्थ आहेत,
रस = 6 गुण = 3 पूर्ण =0 मही =1
'अंकानाम् वामतो गति : ' या नियमानुसार वरील श्लोकाचा अर्थ असा होतो - शालिवाहन शके 1036 साली माझा जन्म झाला आणि वयाच्या 36व्या वर्षी मी सिद्धांतशिरोमणी ह्या ग्रंथाची रचना केली. इसवी सनाप्रमाणे 1036+78=1114 साली भास्कराचार्यांचा जन्म झाला व त्यांनी 1036+36=78+1150 साली सिद्धांतशिरोमणी हा ग्रंथ लिहिला.