Summary of the Book
अभ्यासासाठी, संशोधनासाठी मिळालेली शिष्यवृत्ती कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. नोकरी करतानाही मिळालेली शिष्यवृत्ती करिअरसाठी उपयुक्त ठरते. गजेंद्र बडे यांनी या पुस्तकात अशा काही वैविध्यपूर्ण शिष्यवृत्तींची माहिती दिली आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, पीएच. डी. साठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी,
मुली व महिलांसाठी, युवक, क्रीडा, कला व सांस्कृतिक क्षेत्रासाठीच्या शिष्यवृत्ती, अपंग व अल्पसंख्यांकाच्या शिष्यवृत्ती, माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती अशा वेगवेगळ्या प्रकरणांमधून ही माहिती मिळते. संबंधित शिष्यवृत्तीसाठी पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत यासंबंधातही मार्गदर्शन केले आहे.