Summary of the Book
नव्या जमान्यात सॅलड्ला महत्त्व आले आहे. ह्या कोशिंबीर किंवा सॅलड्स्मुळे मुख्य जेवणाची लज्जत वाढते. जेवणात थोड्या-फार प्रमाणात कच्च्या भाज्या खाल्ल्यामुळे त्यांतील नैसर्गिक जीवनसत्त्वे व क्षार ह्यांचा आपल्या शरीराला फार उपयोग होतो. त्यांतील सौम्य आम्ले पचनाला मदत करतात. सॅलड्सचे वेगवेगळे प्रकार लिहिताना त्यांचे वर्गीकरण केले आहे. एकच पदार्थ वेगवेगळे साहित्य वापरून करता येतो. आणि मग तोच पदार्थ नवा होतो व त्याची चवही वेगवेगळी लागते. नेहमीच्या जेवणात सॅलड्सचा समावेश करणार्या आजच्या गृहिणींना हे पुस्तक सॅलड्सचे वेगवेगळे प्रकार करून पाहण्यासाठी उपयुक्त ठरेल.