Summary of the Book
मराठीतील एक अभिनव शब्दकोश !
प्रत्येक मराठी घरात असलाच पाहिजे असा मराठीतील अभिनव शब्दकोश!
सामान्य वाचक, रसिक, अभ्यासक, संशोधक, साहित्यिक आणि विद्यार्थी अशा सर्वांचा विचार करून या शब्दकोशाची निर्मिती करण्यात आली आहे.
शब्दांचा परस्परांशी असणारा सहसंबंध उलगडून दाखवणारा हा मराठीतील एकमेव शब्दकोश. शब्दाचा नेमका अर्थ आणि त्याची उत्पत्ती याबरोबरच शब्दांची सांस्कृतिक,राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी या शब्दकोशात दिली आहे. मूळ शब्द आणि त्याला उपसर्ग व प्रत्यय लागून तयार होणारे शब्द,विशेषणे,क्रियाविशेषणे,क्रियापदे,संधी,सामाजिक शब्द अशा विविध शब्दाचा पसारा पद्धतशीरपणे या कोशात मांडला आहे. १४०० शीर्ष शब्दांतर्गत एकूण २२,५०० शब्दांचा अर्थ.