Summary of the Book
अनेक शतकांपासून स्त्रीच्या जीवनाचे चूल आणि मूल हेच कार्यक्षेत्र आहे. असं सामान्यत: समाजात रूढ केले गेले, जे थोड्याफार प्रमाणात आजही दिसते. असं असलं, तरी आजच्या बदलत्या समाजात पुरुषांच्या बरोबरीने अनेक क्षेत्रांत वावरताना तिला शिक्षणाच्या जोडीने गृहशास्त्र, बालसंगोपन, गर्भसंस्कार, आहारशास्त्र, आरोग्य अशा विषयांचे मौलिक शिक्षण मिळाले, तर ती अधिक सजग होऊन आपली प्रतिमा अधिक ठळक करू शकेल. याच उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती केली असल्याने यातील माहिती तिला निश्चितच उपयुक्त आणि मोलाची आहे.