दिल, दोस्ती डॉक्टरी
दिल, दोस्ती डॉक्टरी
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 10% OFF
R 300 R 270 / $ 3.46
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होतो, हे साधारण गृहीत धरले जाते. त्यानुसार, आदित्य नेर्लेकर हा वडिलांचा वैद्यकीय पेशा पुढे चालविण्यासाठी डॉक्टरीच्या क्षेत्रात येतो. छोट्या गावातील सुखवस्तू कुटुंबातील आदी पुण्यात शिक्षणासाठी येतो. हॉस्टेलवर विनय नेहेते व अजय तांबे या रूमपार्टनरबरोबर आदीचे कॉलेज लाईफ सुरु होते.

तेथील भकास वातावरणात आदी रुळू लागतो. अनेक मित्रही मिळतात. अभ्यासाबरोबर इतर गोष्टीही सुरु होतात. मित्रांच्या नादाने सिगारेटसारखे व्यसन सुरु होते. त्याची बालपणीची मैत्रीण मधुरा हिच्या गाठीभेटी होऊ लागतात. पण मौजमजेत पहिल्या परीक्षेत नापास झाल्याचा आदिला व त्याच्या मित्रांना झटका बसतो. पुन्हा जोमाने अभ्यास सुरु होतो. मित्रांच्या सुख, दुःखात साथ देताना आदिचेही आयुष्य सुरळीत चालू असते. मधुरासाठी घरून होकार येतो आणि अदीचा आनंद गगनात मावेनासा होतो.

मात्र, त्याच्या सुखाला गालबोट लागते. मधुरा त्याला कायमची सोडून जाते. एकाकी झालेला आदित्य मधुराच्या आठवणी काढीत हॉस्टेलवर रिपिटर्सबरोबर पुढे जाण्याचा निश्चय करतो. डॉ. अमित बिडवे यांची 'दिल, दोस्ती....डॉक्टरी' या कादंबरीतून आदित्य नेर्लेकरांची हि गोष्ट वाचकांना गुंतवून ठेवते.
Book Review
Write a review

Yogesh Chaporkar
01 Sep 2016 05 30 AM

अप्रतिम! या स्टोरीवर सुन्दर सिनेमा बनू शकेल!
Dr.Charuchandra Joshi
01 Sep 2016 05 30 AM

सूक्ष्म निरीक्षणातून उत्पन्न झालेली कलाकृती. मेडिकल विद्यार्थ्याचे आयुष्य, वसतिगृहातच भेटणारी निर्मळ मॆत्री आणि तारूण्य सुलभ प्रेमकथा यांचा त्रिवेणी संगम. अत्यंत चटका लावून जाणारा शेवट. मित्रा, लिहित रहा.
Prasad Autade
01 Sep 2016 05 30 AM

You write really good and from the bottom of heart. I loved the detailing you have done while writing the recent book. Especially the description about the hostel. I really felt that I am not just reading a book but I could feel the things around me. Keep it up and hoping to get more such books from you to read in future.
Kaustubh Pathak
01 Sep 2016 05 30 AM

SIMPLY SUPERB! YOUR WRITING IS UNIQUE, WILL GO LONG WAY!
Dr.Prafulla Bidwe
01 Sep 2016 05 30 AM

अाजच पुस्तक वाचून संपले , परत एकदा ९३ च्या बी जे बॅच ला राहुन अाल्याचा फिल अाला. एकदम मस्त व हुबेहुब लिहले आहे. कीतीही नाही म्हंटले तरी अादीत्यच्या जागी अमितच डोळ्यांसमोर येत आहे.खुप छान! यांवर चित्रपट बनवायला खरच हरकत नाही.
Aditya Deshmukh
01 Sep 2016 05 30 AM

I finished reading the book .Very nice it inspires me to read more of marathi literature .It describes the hostel life beautifully but felt that the ending is a bit sad.But I truly and certainly appreciate the prowess in your writing and it shows clearly why we face failure in our life and how to face it it has influenced me a lot From Aditya
रेखा कारखानीस
01 Sep 2016 05 30 AM

कॅालेज व हॅास्टेल जीवनातील दोस्ती मस्ती व तारूण्यसुलभ प्रेमभावना यांचे सुक्ष्मनिरीक्षणाने प्रांजलपणे केलेले चित्रमय वर्णन व बोलीभाषा वाचकांना मंत्रमुग्ध करते .कादंबरीचा भावस्पर्शी शेवट व सुखदुखांना सामोरी जाणारी डॅाक्टरी वाचकांना अंतर्मुख बनवते. यातच कादंबरीचे यश सामावलय. अमित तुझ्या पुढील साहित्यकृतीसाठी मनापासून शुभेच्छा .
Arvind sudam Thorat
01 May 2016 05 30 AM

Very nice one of best book
Dr Siddharth Kulkarni
01 May 2016 05 30 AM

पुस्तक खूप छान आहे. बॉईज हॉस्टेल मधील राहणं हा अनुभव असण्याऱ्या सर्वांना हे पुस्तक तोच आनंद पुनः देतं. पात्र व वातावरण अगदी खरी वाटतात.90s ची कालनिर्मिती अगदीअचुक.आपल्या हॉस्टेलला राहुन गेलेल्याने पुस्तक लिहिले आहे असं प्रत्येकाला वाटेल. Deja vu म्हणतात तसा भास होतो. आणि मुळात स्टोरी पकडून ठेवणारी. एखादा चित्रपट बघतोय असं वाटतं. अमित कडून अजून अपेक्षा वाढल्या आता! All the best for future novels.
Aditya
01 May 2016 05 30 AM

Very nice.....fantastic book....Must read..
Dhananjay Kulkarni
01 Apr 2016 05 30 AM

अम्या फारच सुंदर!मी स्वतः hostel मध्ये नाही राहिलो परंतु या कादंबरी मधुन ते मी अनुभवल.तुझी निरीक्षण शक्ती केवळ अप्रतिम आणि ते योग्य त्या पध्दतीने तु आमच्या पर्यंत पोहोचवलेस.पाठक्या म्हणतो तसं now u think abot direction seriously .शटल मध्ये लिहिलस तसेच मी माझ्या मित्रांना मी मुद्दाम पुस्तक वाचायला दिले आणि सर्वांना खुप आवडल.मित्रा तोडलस .असच लिहीत रहा we are expecting much more now.
Surekha Papat
01 Feb 2016 05 30 AM

Awesome book.A very hurt touching story and amazing journey of students life
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat