Summary of the Book
सण म्हणजे मनाला आनंद देणारा दिवस! परंतु सण साजरा करणे हे उत्तम पक्वान्ने जोडीला असल्याशिवाय अशक्य आहे! वैयजंती केळकरांच्या या पुस्तकांत प्रत्येक सणास करावयाच्या त्या त्या पक्वान्नांविषयी वैशिष्ट्यपूर्ण व शास्त्रीय सखोल दृष्टिकोनातून दिलेली माहिती मिळते. भारतीय समाजजीवनात सण, उत्सवांना विशेष महत्व आहे. आपल्या पूर्वजांनी मानवी आनंदी, समृद्ध करण्यासाठी ऋतूकाळानुसार सणांची योजना केली आहे.
पाऊसकाळात नागपंचमी, मंगळागौर, पाऊस संपत आला की दिवाळी, चैत्राची पालवी फुटायला लागली की गुढीपाडवा असे कितीतरी सण आहे. यातील मुख्य भाग म्हणजे या सणांना घरोघरी विविध प्रकारची पक्वाने तयार केली जातात. या पक्वानांची यादी सणानुसार बदलत जाते. ऋतुनुसार येणाऱ्या सणांना कोणते पदार्थ तयार केले जातात. त्याची पाककृती, महत्व, सणांची महती, त्यामागील कथा अशी सर्व माहिती 'सण वर्षाचे आणि त्याची पक्वाने' यात वैजयंती केळकर यांनी दिली आहे.
अगदी पंचपाळे कसे असावेत, मसाले कसे बनवायचे, पुरण कसे शिजवायचे, अशा प्राथमिक गोष्टींपासून बटाटा भाजी, मटकी, हरभऱ्याची उसळ, नारळाची चटणी,वांग्याचे भरीत, आळूवडी, बटाटेवडे, दहीवडे, यांचे विविध प्रकार, वडे, पापड, कांदा भाजी, लाडू, करंजा, चिवडा, शंकरपाळे,
गुलाबजाम, चकल्या, चिरोटे, हलवा, थालीपीठ, डोसे याबरोबर अनेक पदार्थांच्या पाककृती यात सांगितल्या आहेत.