Summary of the Book
चारचौघांसारखे जीवन जगणाऱ्या, शहरात राहणाऱ्या तरुणीने जंगलाची तेही आफ्रिकेतील जंगलाची वाट धरली आणि तब्बल ५० वर्षे तेथेचं घालविली. हा कोणता कथेचा, चित्रपटाचा विषय नाही, तर इंग्लंडमधील डॉ. जेन गुडाल या संशोधीकेची खरीखुरी जीवनकहाणी आहे. लहानपणी तिची खेळण्याच्या रुपात चिम्पांझीशी ओळख झाली. वयाच्या आठव्या वर्षापासून तिने आफ्रिकेत जाण्याचे स्वप्न पाहिले अखेर सव्विसाव्या वर्षी तिने आफ्रिकेची वाट धरली. तेथील घनदाट जंगलात ती पोचली आणि नंतर सुरु झाला तो चिम्पांझीचा ध्यास. अभ्यासाबरोबरच त्यांच्याशी तिचे जिवाभावाचे मैत्र जडले. चीम्पाझींचे वर्तन, समूह वर्तन, भाषा, सुखदुःख यांचे संशोधन तिने गोम्बेच्या अरण्यात ५० वर्षे एकटीने राहून केले. गुडाल यांची अविस्मरणीय, अदभूत कहाणी शैलजा देशमुख यांची तितक्याच ताकदीने चीम्पांझींच्या सहवासात डॉ. जेन गुडाल' मध्ये चित्रित केले.